ऊस आंदोलनातील चंदगडचे कार्यकर्ते निर्दोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस आंदोलनातील चंदगडचे कार्यकर्ते निर्दोष
ऊस आंदोलनातील चंदगडचे कार्यकर्ते निर्दोष

ऊस आंदोलनातील चंदगडचे कार्यकर्ते निर्दोष

sakal_logo
By

ऊस आंदोलनातील
चंदगडचे कार्यकर्ते निर्दोष
सकाळ वृ्त्तसेवा
चंदगड, ता. १७ ः कानूर बुद्रुक (ता. चंदगड) येथे २०१३ साली झालेल्या ऊस आंदोलनातील पाच आंदोलकांची आज येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बिराजदार यांनी निर्दोष मुक्तता केली. कृष्णा सतबा पाटील कुरणी, गोविंद बाबू गुडूळकर कानूर बुद्रुक, विठ्ठल रामा तेजम बिजूर, गोविंद बाळू मासरणकर कानूर बुद्रुक व विलास भिकू चौकूळकर नांदूरे अशी त्यांची नावे आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी त्यावेळी टनाला तीन हजार रुपयांचा दर द्यावा या मागणीसाठी एकाच वेळी जिल्ह्यात सर्वत्र रास्ता रोकोचे आंदोलन छेडले होते. तालुक्यात कानूर बुद्रुक, पाटणे फाटा, शिनोळी व कोवाड येथे एकाच वेळी आंदोलन झाले. प्रशासनाने जमावबंदी कायदा लागू करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कानूर बुद्रुक येथे झालेल्या आंदोलनात सुमारे अडीचशे शेतकरी सहभागी झाले होते. या प्रकरणी नेतृत्व करणाऱ्या वरील पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, महाविकास आघाडी शासनाने सामाजिक प्रश्नांसाठी छेडलेल्या आंदोलनात जर आंदोलकांकडून शासकीय मालमत्तेची हानी झाली नसेल तर त्यांना या गुन्ह्यातून मुक्त करावे, अशी सूचना केली होती. त्यानुसार न्यायालयाने नऊ वर्षांनंतर हा दावा निकाली काढला. आंदोलकांच्या वतीने अॅड. एस. के. सावंत यांनी युक्तीवाद केला.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b01842 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top