
मटका अड्ड्यांवर छापे
पाटणे फाटा परिसरात
मटका अड्ड्यांवर छापे
चंदगड पोलिसांची तीन ठिकाणी कारवाई
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १८ ः येथील पोलिसांनी पाटणे फाटा (ता. चंदगड) परिसरातील मटका अड्ड्यांवर छापे टाकून संशयितांवर गुन्हा नोंद केला. त्यांच्याकडून मटक्यासाठी वापरण्यात येणारा मुद्देमाल व रोकड जप्त केली.
तिलारीकडे जाणाऱ्या मार्गावर साईप्रेमी हॉटेलच्या मागे टाकलेल्या छाप्यात ५ हजार ८७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये १ हजार ८० रुपये रोख रक्कम आहे. संशयित राजू भिकू नाईक व युवराज कृष्णा नाईक (दोघेही रा. हलकर्णी, ता. चंदगड) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. याच परिसरात टाकलेल्या दुसऱ्या छाप्यात संशयित धाकलू तुकाराम नाईक (रा. हलकर्णी, ता. चंदगड) व हेमंत ऊर्फ कुमार तुकाराम पाटील (रा. तावरेवाडी, ता. चंदगड) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. हेमंतच्या सांगण्यावरून धाकलू हा अड्डा चालवत होता. त्याच्याकडे १ हजार ६० रुपये रोख व इतर साहित्य मिळून ५ हजार ६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस कॉन्स्टेबल दत्तात्रय पाटील व संदीप कांबळे यांनी फिर्याद दिली. उपनिरीक्षक नाईक तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b01844 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..