हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी शिनोळी येथे पोलिसांकडून तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी शिनोळी येथे पोलिसांकडून तपासणी
हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी शिनोळी येथे पोलिसांकडून तपासणी

हुल्लडबाज पर्यटकांना रोखण्यासाठी शिनोळी येथे पोलिसांकडून तपासणी

sakal_logo
By

01313
शिनोळी : पोलिसांनी पर्यटकांच्या गाड्या थांबवून तपासणी केली.

लोगो : सकाळ बातमीचा परिणाम

हुल्लडबाज पर्यटकांना रोखणार
पोलिसांकडून तपासणी; महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर नाका
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ४ : तालुक्यातील विविध पर्यटनस्थळी येऊन हुल्लडबाजपणा करणाऱ्या पर्यटकांना आवर घालण्यासाठी पोलिसांकडून तपासणी गरजेची अशा आशयाची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेऊन आज पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर शिनोळी (ता. चंदगड) येथील तपासणी नाका उभारून पर्यटकांची कसून तपासणी केली.
महिपाळगडाच्या पायथ्याला सुंडीचा धबधबा, तिलारीनगर येथील धबधबे, पारगड आदी ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. सध्या या विभागात पावसाने धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येत आहेत. मात्र यामध्ये काही पर्यटक मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालतात. वेगाने वाहन चालवणे, रस्त्याने चालणाऱ्या स्थानिक नागरिकांना धक्का देणे, विचित्र हावभाव करणे, महिलांकडे पाहून अश्‍लील टिपण्णी करणे, दारूच्या बाटल्या रस्त्यात फोडणे असे प्रकार होतात. याकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधले होते. शिनोळी, पाटणे फाटा, नागनवाडी आणि हिंडगाव फाटा येथे सुटीच्या दिवशी पोलिसांनी तपासणी करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार आज शिनोळी येथे प्रत्येक वाहन थांबवून तपासणी करण्यात आली. आक्षेपार्ह साहित्य किंवा दारू पिलेल्या पर्यटकांना माघारी परतवले. या संदर्भात दरम्यान, आजची कारवाई दंडात्मक नव्हती तर पर्यटकांना व्यवस्थित वागा हे सांगण्यासाठी होती. तरीही सुधारणा न झाल्यास कारवाई करावी लागेल.
---------------
चौकट
प्रत्येक पॉईंटवर पोलिसांची गरज
शिनोळी येथे पोलिसांनी तपासणी करून सोडले असले तरी सुंडीच्या धबधब्यावर आलेल्या काही पर्यटकांच्या मनावर ताबा राहिला नाही. त्यांच्याकडून हुल्लडबाजपणा सुरू होता. प्रत्येक पॉईंटवर पोलिस तैनात केले तरच त्यांना आवर घालणे शक्य असल्याचे सांगितले जाते.
--------------
कोट
निसर्गाचा आस्वाद घेण्याची मुभा प्रत्येक नागरिकाला आहे. परंतु त्यासाठी स्वयंशिस्तही महत्त्‍वाची आहे. आपल्या वागण्यातून इतरांना त्रास होणार नाही, निसर्गाची हानी होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.
- संतोष घोळवे, पोलिस निरीक्षक

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b01864 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..