मोबाईल सेवेबद्दल हलकर्णीत तक्रारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल सेवेबद्दल हलकर्णीत तक्रारी
मोबाईल सेवेबद्दल हलकर्णीत तक्रारी

मोबाईल सेवेबद्दल हलकर्णीत तक्रारी

sakal_logo
By

मोबाईल सेवेबद्दल
हलकर्णीत तक्रारी
चंदगड ः हलकर्णी (ता. चंदगड) परिसरातील खासगी मोबाईल कंपनीच्या सेवेबद्दल तक्रारी आहेत. सातत्याने इंटरनेट सुविधा बंद राहणे, वेग मंदावणे, अनेकदा नेटवर्कच बंद राहणे असे प्रकार होत आहेत. गेल्या महिन्यात सलग पंधरा दिवस नेटवर्क बंद होते. अनेक ग्राहक प्रीपेड सेवा घेतात. एक महिन्यापासून ते सहा महिने, वर्षभराचे पैसे आगाऊ भरतात; मात्र सेवा बंद काळातील कालावधी त्यांना वाढवून मिळत नाही. त्यामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होते. यासंदर्भात विचारणा करायची कोणाकडे, असा प्रश्‍न ग्राहकांना आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून सेवा सुरळीत करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b01870 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top