
चंदगडला जिल्हा परिषदेसाठी अनुसूचित जातीला आरक्षण द्या
चंदगडला जिल्हा परिषदेसाठी
अनुसूचित जातीला आरक्षण द्या
अॅड. अनंत कांबळे; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३१ : जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी चंदगड तालुक्यातून जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणामध्ये अनुसूचित जातीवर अन्याय झाला आहे. पाचपैकी एकही जागा या समाजासाठी आरक्षित ठेवलेली नाही. त्याबाबत निर्णय घेऊन या समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी माजी सभापती अॅड. अनंत कांबळे यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिले आहे.
सध्या तालुक्यातील पाचपैकी तीन जागा ओबीसींसाठी, तर एक सर्वसाधारण महिला व एक सर्वसाधारण पुरुषसाठी आरक्षित झाली आहे. यामध्ये अनुसूचित जातीच्या उमेदवाराला संधीच मिळालेली नाही. १९९६ ला तुडीये मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित होता. त्यानंतर आजअखेर एकदाही आरक्षण आलेले नाही. तालुक्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या विचारात घेता या जातीसाठी किमान एक जागा राखीव असणे अपेक्षित आहे. त्याबाबत गांभीर्याने विचार करावा. सध्याचे आरक्षण रद्द करून या समाजाला आरक्षण लागू करून मग नव्याने जाहीर करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b01898 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..