अॅड.मळवीकर यांचा नांदवडे येथे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अॅड.मळवीकर यांचा नांदवडे येथे सत्कार
अॅड.मळवीकर यांचा नांदवडे येथे सत्कार

अॅड.मळवीकर यांचा नांदवडे येथे सत्कार

sakal_logo
By

01417
नांदवडे : अॅड. संतोष मळवीकर यांना मानपत्र देताना मानसिंग खोराटे. शेजारी जे. जी. पाटील, जयसिंग पाटील, बाबूराव पाटील आदी.


अॅड. मळवीकर यांचा
नांदवडे येथे सत्कार
चंदगड, ता. ७ : चंदगड तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रात अॅड. संतोष मळवीकर यांचे कार्य सर्वसामान्यांसाठी आश्‍वासक आहे. दीड दशकाच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली, असे गौरवोद्‌गार दौलत-अथर्व इंटरट्रेड कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी काढले. नांदवडे (ता. चंदगड) येथे सामाजिक कार्याबद्दल अॅड. मळवीकर यांचा सत्कार कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. सरपंच राजेंद्र कांबे अध्यक्षस्थानी होते.
खोराटे म्हणाले, ‘‘मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. परंतु मळवीकर यांचे काम पाहात आलो आहे. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी त्यांनी उभारलेले लढे कौतुकास्पद आहेत.’’ खोराटे यांच्या हस्ते मळवीकर यांना मानपत्र देण्यात आले. अशोक दळवी, जे. जी. पाटील, दयानंद गावडे यांनी मनोगते व्यक्त केली. सत्काराला उत्तर देताना मळवीकर म्हणाले, ‘‘कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना आई-वडील आणि गुरुजनांनी केलेल्या संस्काराच्या शिदोरीवर समाजासाठी माझ्या परीने काम करीत आहे.’’ बाबूराव पाटील, अरुण पाटील, नामदेव गावडे, आप्पाजी गावडे, मारुती पाटील, संजय गावडे, संतोष गावडे, जयसिंग पाटील, संदीप गावडे, बापू शिरगावकर यांच्यासह दौलत कारखान्याचे कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. जयवंत पेडणेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. विठ्ठल गावडे यांनी सूत्रसंचालन केले. सुनील शिंदे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b01920 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..