पाटणेचे प्रवाशी निवारा शेड बनलेय भंगारचे गोडाऊन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटणेचे प्रवाशी निवारा शेड बनलेय भंगारचे गोडाऊन
पाटणेचे प्रवाशी निवारा शेड बनलेय भंगारचे गोडाऊन

पाटणेचे प्रवाशी निवारा शेड बनलेय भंगारचे गोडाऊन

sakal_logo
By

01424
पाटणे : प्रवासी निवारा शेडमध्ये असे भंगारचे साहित्य भरून ठेवले आहे.


पाटणेचे प्रवासी निवारा शेड
बनलेय भंगारचे गोडावून
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ५ : पाटणे (ता. चंदगड) येथील प्रवासी निवारा शेड भंगारचे साहित्य ठेवण्याचे गोडावून बनले आहे. अनेक वर्षांपासून त्याचा वापर नसल्याने भंगारचे साहित्य या शेडमध्ये भरून ठेवले आहे. याबाबत एसटी महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आक्षेप घेतला गेला नसल्याने राजरोसपणे त्याचा गैरवापर सुरू आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र, कोकण आणि गोव्याला जोडणाऱ्या मार्गावर पाटणे हे गाव आहे. तिलारी घाटातून कोकण आणि गोव्याला जोडणारा हा जवळचा मार्ग असल्याने कर्नाटकसह तमिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश आदी राज्यांतील वाहतूक याच मार्गावरून होते. या भागात पावसाचे प्रमाण प्रचंड असते. अशा काळात प्रवाशांना निवारा म्हणून वीस वर्षांपूर्वी येथे प्रवासी निवारा शेड बांधण्यात आले होते. त्याचा वापरही चांगला होता; परंतु हळूहळू या शेडची दुरवस्था होत गेली. त्यामुळे प्रवासी शेडऐवजी झाडाखालीच उभे राहू लागले. एसटी महामंडळ आणि बांधकाम खात्यानेही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा वापर बंद झाला. दरम्यान, अलीकडच्या काळात त्यामध्ये काहींनी भंगारचे साहित्य भरून ठेवले आहे. विचारणारे कोणी नसल्याने राजरोजसपणे हा गैरवापर सुरू आहे. यासंदर्भात प्रवाशांतून नाराजी आहे. शेडचा गैरवापर बंद करावा तसेच त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b01924 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top