ज्येष्ठ नागरीक मार्गदर्शन कक्ष तालुका स्तरावर स्थापन होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरीक मार्गदर्शन कक्ष
तालुका स्तरावर स्थापन होणार
ज्येष्ठ नागरीक मार्गदर्शन कक्ष तालुका स्तरावर स्थापन होणार

ज्येष्ठ नागरीक मार्गदर्शन कक्ष तालुका स्तरावर स्थापन होणार

sakal_logo
By

ज्येष्ठ नागरीक मार्गदर्शन कक्ष
तालुका स्तरावर स्थापन होणार
समाजकल्याण विभागाचा निर्णय; समन्वय-सनियंत्रण समितीचा पाठपुरावा
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ७ : कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरीक मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्याबाबत समाजकल्याण विभागाने आदेश काढला आहे. जिल्हा ज्येष्ठ नागरिक सनियंत्रण समिती तथा समाजकल्याण विभागाचे कोल्हापूर सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपालिका, नगरपरिषदा तसेच नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना याबाबतच्या सुचना दिल्या आहेत.
राज्याच्या ज्येष्ट नागरीक सर्वसमावेशक धोरण २१०३ नुसार अंमलबजावणी करण्याबाबत सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने करायच्या उपाययोजना नमूद केल्या आहेत. वृध्दांसाठी असणाऱ्या शानसाच्या सर्व योजा एकाच छताखाली आणून त्याचा लाभ संबंधित वृध्दांना देण्यासाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरीक कक्ष स्थापन करण्याबाबत सुचीत केले आहे. जिल्हा स्तरावर अशा प्रकारचे कक्ष स्थापन झाले आहेत. परंतु ग्रामीण भागातील ज्येष्टांना जिल्ह्याच्या ठिकाणी येणे शक्य नाही. त्यांना त्यांच्या तालुका स्तरावर अशा प्रकारची सोय करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरीक समन्वय व सनियंत्रण समितीने केली होती. त्यानुसार तालुका स्तरावर ज्येष्ठ नागरीक मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. या कक्षामध्ये बैठकीची स्वतंत्र व्यवस्था तसेच समुपदेशनासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, असेही आदेशात सुचित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे.
----------------
कोट
ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी तालुका स्तरावर मार्गदर्शन कक्ष असणे अत्यंत गरजेचे होते. ज्येष्ठ नागरीक संघटना त्यासाठी आग्रही होती. त्यांचा मान राखून समाजकल्याण विभागाने प्रत्येक तालुका स्तरावर कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला याचे समाधान आहे.
- सोमनाथ गवस, जिल्हा सहसचिव फेस्कॉम

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b01931 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..