सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा ‘सांगाती’ सत्कार करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा
‘सांगाती’ सत्कार करणार
सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा ‘सांगाती’ सत्कार करणार

सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा ‘सांगाती’ सत्कार करणार

sakal_logo
By

सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा
‘सांगाती’ सत्कार करणार
चंदगड, ता. ११ ः शिनोळी (ता. चंदगड) औद्योगिक वसाहतीतील सांगाती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार होणार आहे. २०१९-२० वर्षात चौथी व सातवीच्या वार्षिक परीक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण, दहावीत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण, बारावी कला व वाणिज्य शाखेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक, तर विज्ञान शाखेत ६५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असायला हवेत; तर २०२०-२१ व २०२१-२२ वर्षात चौथी, सातवी व दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण, बारावी कला व वाणिज्य शाखेत ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण, विज्ञान शाखेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण, पदवी व पदव्युत्तर परीक्षेत ७५ पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेच्या झेरॉक्स प्रती आवश्यक आहेत. सन २०१९ ते २०२२ या कालावधीत तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय अथवा आंतरराज्य पातळीवरील कला, क्रीडा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार होईल. प्रमाणित केलेली सर्व कागदपत्रे संस्थेच्या शिनोळी मुख्य कार्यालय किंवा हलकर्णी फाटा, कोवाड, तुडये, चंदगड यापैकी एका कार्यालयात जमा करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष हिरामणी तुपारे यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b01957 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..