‘शिवमुद्रा’तर्फे शालेय साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिवमुद्रा’तर्फे शालेय साहित्य वाटप
‘शिवमुद्रा’तर्फे शालेय साहित्य वाटप

‘शिवमुद्रा’तर्फे शालेय साहित्य वाटप

sakal_logo
By

01537
कानूर बुद्रूक : शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना पदाधिकारी.

‘शिवमुद्रा’तर्फे शालेय साहित्य वाटप
चंदगड : कानूर बुद्रुक (ता. चंदगड) येथील शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे प्राथमिक विद्या मंदिर व भावेश्‍वरी संदेश विद्यालयातील ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हर्षवर्धन सावंत-भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सार्वजनिक उपक्रम राबवले जातात. गावच्या विकासकामांत सहयोग देण्याचा प्रयत्न असतो. शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे साधन असल्याने शैक्षणिक विकासाला सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक कोळी, अशोक देवण यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि गावातील सुजाण नागरिक यांच्या समन्वयातून प्रगती साधणे सोपे जाते, असे मत कोळी यांनी व्यक्त केले. महेश आगलावे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b01989 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..