ग्रामीण भागात रोजगाराच्या अनेक संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागात रोजगाराच्या अनेक संधी
ग्रामीण भागात रोजगाराच्या अनेक संधी

ग्रामीण भागात रोजगाराच्या अनेक संधी

sakal_logo
By

01539

-----------------------------
ग्रामीण भागात रोजगाराच्या अनेक संधी
डॉ. परशराम पाटील; व्ही. के. चव्हाण-पाटील महाविद्यालयात मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १९ ः ग्रामीण भागातील उपलब्ध जैवविविधतेचा विचार करता याच भागात रोजगाराच्या अनेक संधी आहेत, असे मत कृषितज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केले. पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील व्ही. के. चव्हाण-पाटील महाविद्यालयात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव जे. बी. पाटील अध्यक्षस्थानी होते.
प्राचार्य यु. डी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. पाटील म्हणाले, ‘भारतात हिमालय पर्वतराजी आणि पश्‍चिम घाट ही जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण स्थळे आहेत. आपला परिसर हा पश्‍चिम घाटाला संलग्न आहे. या विभागात जे काही उत्पादित होते त्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे तरुणांनी त्याचा लाभ उठवायला हवा. या विभागात काजू तसेच मध उत्पादनाला मोठा वाव आहे. जगभरात त्याला मागणीही मोठी आहे. कोल्हापूर विभागात उत्पादित होणाऱ्या मधाचा दर्जा हा जागतिक पातळीवर सर्वश्रेष्ठ आहे. या संधीचा लाभ घ्यायला हवा.’ जे. बी. पाटील म्हणाले, ‘पूर्वी शेती व्यवसायाला प्राधान्य होते. मधल्या काळात नोकरी व व्यवसायाला महत्त्व आले. परंतु, अलीकडच्या काळात पुन्हा शेतीचेच महत्त्व वाढू लागले आहे. तरुणांनी योग्य ज्ञान संपादन करून त्याचा शेतीसाठी वापर केला तर स्थानिक पातळीवर रोजगाराची मोठी संधी आहे.’ प्रा. ए. टी. आपके यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. एस. ए. पाटील यांनी आभार मानले. प्रा. पी. एस. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b01990 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..