चंदगड बाजारपेठेतील खड्डे भरण्यास सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगड बाजारपेठेतील खड्डे भरण्यास सुरवात
चंदगड बाजारपेठेतील खड्डे भरण्यास सुरवात

चंदगड बाजारपेठेतील खड्डे भरण्यास सुरवात

sakal_logo
By

01553
चंदगड : सार्वजनिक बांधकाम विभागाने बाजारपेठेतील रस्त्यात पडलेले खड्डे भरण्यास सुरवात केली आहे.

चंदगड बाजारपेठेतील
खड्डे भरण्यास सुरवात
चंदगड, ता. २३ : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येथील बाजारपेठेतील रस्त्यात पडलेले खड्डे भरण्यास सुरवात झाली आहे. नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी उपअभियंत्यांना भेटून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेऊन या कामाला सुरवात झाली.
चंदगड फाटा ते हेरे-तिलारीनगरकडे जाणारा मार्ग बाजारपेठेतून जातो. या मार्गावर जागोजागी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. पावसाचे पाणी साचून राहिल्याने रस्त्याचे डांबर कमकुवत होते आणि त्यातून वाहनांची वर्दळ झाल्यावर खड्ड्याचा आकार वाढत जातो. या मार्गावर लहान आणि मोठ्ठे वजन वाहून नेणाऱ्या वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बाजारपेठेत आजरा अर्बन बॅंकेच्या शाखेसमोर आणि शिवाजीराव पाटील ज्वेलर्सच्या समोर मोठ्ठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे काही अपघातही घडले. त्यामुळे संतप्त नागरिकांतून बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत प्रतिक्रिया उमटू लागल्या. हळदणकर यांनी यासंदर्भात उपअभियंत्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे रस्तादुरुस्तीची मागणी केली. त्यानुसार काम सुरू झाले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b01997 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..