चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या
चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या

चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

01570
हलकर्णी : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करताना गोपाळराव पाटील. शेजारी उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. आजळकर आदी.

हलकर्णी महाविद्यालयात वृक्षारोपण
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या आवारात संस्थेचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. आजळकर, प्रा. पी. ए. पाटील, डॉ. अनिल गवळी, डॉ. राजेश घोरपडे, प्रा. यु. एस. पाटील, प्रशांत शेंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. एनएसएसचे विभागप्रमुख प्रा. जी. जे. गावडे यांनी प्रास्ताविक केले. एनएसएसचे स्वयंसेवक भैरव पाटील, संजीवनी पाटील, इंद्रायणी पाटील, हर्षद कांबळे, पृथ्वीराज पाटील, सुमित्रा पटेल यांनी सहभाग घेतला. सुजित पाटील व दिलीप पाटील यांचे सहकार्य लाभले. प्रकल्प अधिकारी प्रा. शाहू गावडे व प्रा. अंकुश नौकुडकर यांनी संयोजन केले.
--------------
‘हलकर्णी’मध्ये स्वागत समारंभ
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ झाला. प्राचार्य डॉ. बी. डी. आजळकर अध्यक्षस्थानी होते. शिक्षणातून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आत्मियतापूर्वक ज्ञानार्जन करावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. आय. आर. जरळी, डॉ. राजेश घोरपडे, डॉ. जे. जे. व्हटकर यांनी महाविद्यालयाची वैशिष्ट्ये सांगितली. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जे. जे. व्हटकर यांनी आभार मानले.
--------------
‘न. भु. पाटील’मध्ये शालेय निवडणूक
चंदगड : येथील न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची निवडणूक झाली. बाराशे विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. अक्षय पिराजी याची मुख्यमंत्रिपदी, तर पौर्णिता तुपारे या विद्यार्थिनीची प्रतिनिधीपदी निवड झाली. प्रारंभी प्राचार्य आर. पी. पाटील यांनी निवडणुकीचे लोकशाहीतील महत्त्व स्पष्ट केले. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावी हा हेतू असल्याचे सांगितले. प्रा. एम. एम. आमणगी, प्रा. बी. डी. मोरे, प्रा. एस. ए. शेख, प्रा. व्ही. बी. गावडे, प्रा. एस. एम. नीळकंठ यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रा. एस. ए. धायगुडे यांनी निवडणूक आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02005 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..