चंदगडला शुक्रवारी उद्योजक, नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडला शुक्रवारी उद्योजक, नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन
चंदगडला शुक्रवारी उद्योजक, नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन

चंदगडला शुक्रवारी उद्योजक, नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन

sakal_logo
By

चंदगडमध्ये उद्या उद्योजक,
नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन
चंदगड, ता. २४ : तालुक्यातील उद्योजक आणि नव उद्योजकांसाठी शुक्रवारी (ता. २६) मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सकाळी साडेदहा ते दुपारी तीन या वेळेत हा कार्यक्रम होणार असल्याचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी सांगितले.
उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या विभागाची माहिती पत्रके घेऊन हजर राहणार आहेत. सर्व योजनांसाठी कर्ज मागणी अर्ज व ऑनलाईन योजनेसाठी संबंधित तपशील व पूर्ण माहिती दिली जाणार आहे. यशस्वी उद्योजक, जिल्हा अग्रणी बॅंक, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी विभाग, नाबार्ड, ग्रामीण जीवन उन्नती अभियान, जिल्हा रेशीम कार्यालय, मत्स्य व्यवसाय, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सारथी संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळ, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ या विभागांचे अधिकारी माहिती देणार आहेत. इच्छुकांनी जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म तारखेचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, रेशन कार्ड, बॅंक पासबुक आदी कागदपत्रांची मूळ प्रत व एक झेरॉक्स प्रत घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02007 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..