संघटना प्रतिनिधींच्या अट्टाहासापोटी कामगार वेठीला : मानसिंग खोराटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संघटना प्रतिनिधींच्या अट्टाहासापोटी 
कामगार वेठीला : मानसिंग खोराटे
संघटना प्रतिनिधींच्या अट्टाहासापोटी कामगार वेठीला : मानसिंग खोराटे

संघटना प्रतिनिधींच्या अट्टाहासापोटी कामगार वेठीला : मानसिंग खोराटे

sakal_logo
By

संघटना प्रतिनिधींच्या अट्टाहासापोटी
कामगार वेठीला : मानसिंग खोराटे
मागण्यांबाबत ‘अथर्व’चे प्रशासन नेहमीच सकारात्मक
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २४ : दौलत कारखाना चालवायला घेतलेल्या पहिल्या दिवसापासून तोट्यात आहे. कोट्यावधी रुपयांचा तोटा सहन करुनही कामगार, शेतकरी, तोडणी- वाहतूकदार या सर्वांचे वेळेत पैसे अदा केले आहेत. कामगारांच्या मागण्यांबाबत नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. परंतु एका कामगार संघटनेच्या प्रतिनिधींच्या अट्टाहासापोटी सहाशे कामगारांना वेठीला धरले जात असल्याचा आरोप दौलत कारखाना चालवायला घेतलेल्या अथर्व इंटरट्रेड कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी केला. आज पत्रकार परिषदेत केला.
खोराटे म्हणाले, ‘‘कामगारांच्या दोन संघटनेमध्ये कोण अधिकृत यावरुन न्यायालयीन वाद आहे. त्यामध्ये त्यांनी अथर्व कंपनीलाही पार्टी केले आहे. न्यायालयाने यासंदर्भात जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत कोणत्याही संघटनेशी व्यवस्थापनाने चर्चा करू नये, असे आदेश बजावले आहेत. त्यामुळे कामगारांच्या मागण्यांबाबत थेट चर्चेला बसता येत नाही. संघटनांनी या वादातून कंपनीला वगळल्यास चर्चा करणे सोपे जाईल, असे सांगितल्यावर इंटक संघटनेने माघार घेतली. परंतु सीटू संघटनेने माघार घेतली नाही. यातूनही पर्यायी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला होता. नांदवडे येथे अॅड. संतोष मळवीकर यांच्या सत्कार कार्यक्रमात कामगारांची पगार कपात बंद करण्याचा निर्णय त्यांच्याकरवी जाहीर केला होता. टप्याटप्याने प्रत्येक विभागात जाऊन कामगारांपर्यंत हा संदेश द्यायचा होता. परंतु तत्पूर्वीच संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी कामगारांत गैरसमज पसरवला.
साडे तीन हजार गाळप क्षमतेच्या कारखान्यासाठी ३७९ कामगार असायला हवेत. या कारखान्यात एकूण ७४७ कामगार होते. ६५ कामगारांची सेवाज्येष्टता डावलून ९९ जणांना कायम करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यावर या ६५ जणांना कायम करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यामुळे कंपनीवर महिन्याला एक कोटी रुपयांचा बोजा वाढत होता. त्यापैकी ३० लाख रुपयांची जबाबदारी कंपनीने उचलली. तर ९९ जणांनी आपल्या पगारातून दर महिन्याला तीन हजार रुपये आणि इतर कर्मचाऱ्यांनी आपल्या मर्जीनुसार शंभर, दोनशे रुपयांची कपात करण्यास मान्यता दिली. त्यानुसार ही कपात होत होती, असेही खोराटे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02014 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..