गुडेवाडी ग्रामसभेबाबत तक्रार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुडेवाडी ग्रामसभेबाबत तक्रार
गुडेवाडी ग्रामसभेबाबत तक्रार

गुडेवाडी ग्रामसभेबाबत तक्रार

sakal_logo
By

गुडेवाडी ग्रामसभेबाबत तक्रार
चंदगड, ता. २९ : गुडेवाडी (ता. चंदगड) येथे आज झालेली ग्रामसभा सरपंच महादेव पाटील यांनी अन्य सदस्यांना विश्‍वासात न घेता बोलावली असून, या सभेचे इतिवृत्त कायदेशीर मानू नये. ही सभा नव्याने बोलवावी, अशी मागणी उपसरपंच परशराम कोकीतकर यांच्यासह सहा सदस्यांनी केली आहे. याबाबत गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांना निवेदन देण्यात आले. सरपंच पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. सभेपुढे चर्चेला येणाऱ्या पहिल्याच विषयाला उपस्थितांनी विरोध केला. त्यानंतर गोंधळाचे वातावरण तयार झाले. त्यावर उपसरपंच कोकीतकर यांनी ही सभा तहकूब करून नंतर सभा बोलवावी, अशी मागणी ग्रामसेवकांकडे केली. यासंदर्भात सरपंच पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02029 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..