नागवे-चंदगड कॉलेज बस सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागवे-चंदगड कॉलेज बस सुरू
नागवे-चंदगड कॉलेज बस सुरू

नागवे-चंदगड कॉलेज बस सुरू

sakal_logo
By

01615
नागवे : एसटीचे पूजन करताना चंदगडचे नगरसेवक बाळासाहेब हळदणकर, सरपंच मनीषा देशपांडे, उपसरपंच मारुती नाडगौडा, पोलिस पाटील नंदकुमार नाडगौडा आदी.

नागवे-चंदगड बस सुरू
चंदगड : नागवे (ता. चंदगड) येथून पहाटे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निघणारी चंदगड बस दोन वर्षे बंद होती. येथील नगरसेवक बाळासाहेब हळदणकर व स्थानिक नागरिकांनी आगार व्यवस्थापक अमर निकम यांची भेट घेऊन एसटी सुरू करण्याबाबत विनंती केली. त्यानुसार ही बस सुरू झाली. हळदणकर, सरपंच मनीषा देशपांडे, उपसरपंच मारुती नाडगौडा, पोलिस पाटील नंदकुमार नाडगौडा, संभाजी नाडगौडा, कृष्णा पेडणेकर, नारायण गुरव, रामचंद्र पेडणेकर, मारुती गुरव, रघू म्हाडगूत, हरी कांबळे, पांडुरंग कांबळे, संदीप गावडे यांच्या उपस्थितीत एसटीचे पूजन झाले. चालक एस. एस. सिताप, वाहक डी. एस. बांबळे यांचा सत्कार करण्यात आला. बस सुरु झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02030 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..