त्रीपक्षीय करारानुसारच कामगारांची पगारवाढीची मागणी : प्रा. जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्रीपक्षीय करारानुसारच कामगारांची 
पगारवाढीची मागणी : प्रा. जाधव
त्रीपक्षीय करारानुसारच कामगारांची पगारवाढीची मागणी : प्रा. जाधव

त्रीपक्षीय करारानुसारच कामगारांची पगारवाढीची मागणी : प्रा. जाधव

sakal_logo
By

त्रिपक्षीय करारानुसारच कामगारांची
पगारवाढीची मागणी : प्रा. जाधव
व्यवहार्य भूमिका मांडूनही व्यवस्थापनाकडून नकार
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १ : दौलत-अथर्व कारखान्याचे कामगार हे बंद काळातील पगार मागत नाही, तर २०१९ मधील त्रिपक्षीय करारानुसार देय पगार मागत आहेत. व्यवस्थापनाकडून गेली तीन वर्षे २०११ चा पगार दिला जात आहे. त्याच्याशी सध्याच्या पगाराची तुलना केल्यास व्यवस्थापनाला पगारवाढ मोठी वाटते. त्रिपक्षीय करारानुसार सुरुवातीपासून पगारवाढ होत गेली असती, तर आता त्यामध्ये केवळ १२ टक्केच वाढ करावी लागली असती, असा खुलासा चंदगड तालुका साखर कामगार युनियनतर्फे प्रा. सुभाष जाधव यांनी केला आहे.
अथर्व कंपनीने कारखाना चालवायला घेतला त्यावेळी २०१४ चा पंधरा टक्के पगारवाढीचा त्रिपक्षीय करार लागू होता. मात्र त्याप्रमाणे वाढ झालीच नाही. २०११ च्या पगारामध्ये वार्षिक वेतनवाढ द्यायची नाही, महागाई भत्ता द्यायचा नाही आणि त्याही पगारातून कपात चालूच ठेवायची असा प्रकार केला गेला. संघटनेने २०१४ व २०१९ चे करार लक्षात घेऊन वार्षिक वेतनवाढीसह ऑगस्ट २०२२ चे कामगारांचे पगार निश्‍चित करावे. त्यानुसार पगारात होणाऱ्या वाढीच्या पन्नास टक्के आत्ता लागू करावी उर्वरित पन्नास टक्के वाढ एप्रिल २०२३ पासून लागू करावी. देय वेतन फरक ऑक्टोबर २०२३ पासून समान तीन सहामाही हप्त्याने द्यावा, अशी व्यवहार्य भूमिका घेतली होती. परंतु व्यवस्थापनाने तीन वर्षांत प्रती वर्षी केवळ एक कोटी रुपयांची वाढ देण्याची अन्यायी भूमिका घेतली. त्यांनी न्याय्य व कायदेशीर भूमिकेने कामगारांच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीवर संघटना ठाम असल्याचे जाधव यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02039 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..