उत्सवातील आनंद जोपासण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण महत्वाचे चंद्रकांत बोडरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उत्सवातील आनंद जोपासण्यासाठी 
पर्यावरणाचे संरक्षण महत्वाचे
चंद्रकांत बोडरे
उत्सवातील आनंद जोपासण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण महत्वाचे चंद्रकांत बोडरे

उत्सवातील आनंद जोपासण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण महत्वाचे चंद्रकांत बोडरे

sakal_logo
By

01631
होसूर : पोलिस निरीक्षक संतोष घोळवे व गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्या हस्ते पर्यावरणपूरक गणपतीची प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली.

उत्सवातील आनंद जोपासण्यासाठी
पर्यावरणाचे संरक्षण महत्त्वाचे
चंद्रकांत बोडरे; होसूरला पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १ : सण, उत्सवांचा आनंद जोपासण्यासाठी पर्यावरणाचे संरक्षणसुद्धा तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी व्यक्त केले. होसूर (ता. चंदगड) येथील सुबराव पवार यांच्या घरी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे प्रमुख उपस्थित होते.
कोल्हापूर येथील जागर फाउंडेशनने गणपतीच्या पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्या आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या औषधांचा समावेश केला आहे. त्यामुळे ही मूर्ती नदीत विसर्जित केल्यानंतर प्रदूषण न होता पाण्याचे शुद्धिकरण होत असल्याचा त्यांचा दावा आहे. पवार यांचा पर्यावरण रक्षणासाठी अनेक वर्षांपासून सक्रिय सहभाग आहे. २०१६ पासून त्यांनी मूर्ती दान अभियानात सहभाग घेतला. यावर्षी त्यांनी आपल्या घरी पर्यावरणपूरक गणपतीची प्रतिष्ठापना करून ग्रामस्थांसमोर आणखी एक चांगला पर्याय ठेवला. त्याचे अनुकरण इतरांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. काळानुसार प्रथा, परंपरेमध्ये बदल करायला हवेत तरच पुढची पिढी समृद्ध जीवन जगू शकेल, असे मत त्यांनी मांडले. यावेळी सरपंच राजाराम नाईक, एस. एल. पाटील, अमोल देसाई, भावकाना कुकडोळकर, यल्लूबाई देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पुंडलिक पवार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02040 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..