तरुणाकडून वडिलांचा गळा आवळून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणाकडून वडिलांचा
गळा आवळून खून
तरुणाकडून वडिलांचा गळा आवळून खून

तरुणाकडून वडिलांचा गळा आवळून खून

sakal_logo
By

47397
तरुणाकडून वडिलांचा
गळा आवळून खून
---
चंदगड तालुक्यात प्रकार, मुलगा ताब्यात
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २ ः गुळंब (ता. चंदगड) येथील तरुणाने वडील राजू सट्टू दळवी (वय ५४) यांचा गळा दाबून खून केला. या प्रकरणी चंदगड पोलिसांनी संशयित रोहित राजू दळवी (२२) याला ताब्यात घेतले आहे. रोहितचा मोठा भाऊ वैभव याने यासंदर्भात येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. काल (ता. १) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः राजू दळवी यांचे मोठे पुत्र वैभव चिंचणी (जि. सातारा) येथे हॉटेल कामगार आहे. काल रात्री साडेअकराच्या सुमारास वैभव यांच्या बहिणीचे सासरे सीताराम गावडे यांनी त्यांना दूरध्वनीवरून तुमच्या वडिलांची प्रकृती बरी नसून, त्वरित गावाकडे या, असा निरोप दिला. वैभव खासगी वाहनाने पहाटे चारला गावात आले. त्या वेळी वडिलांना प्रकृती खूपच बिघडल्याने चंदगड ग्रामीण रुग्णालयात नेले होते; परंतु उपचारांपूर्वीच ते मृत झाल्याचे सांगण्यात आले. त्यावर वैभव यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन वडिलांचा मृतदेह पाहिला. गळ्याभोवती काळा व्रण आणि चेहऱ्यावर ओरबाडल्याच्या खुणा दिसत होत्या. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीनंतर डॉक्टरांनीही याला दुजोरा दिला. वैभव यांनी रोहितकडे विचारणा केली असता त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. त्यानंतर रोहितनेच वडिलांचा खून केल्याची फिर्याद वैभव यांनी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी रोहितला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अंकुश कारंडे तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02049 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..