साखर कामगाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखर कामगाराचा मृत्यू
साखर कामगाराचा मृत्यू

साखर कामगाराचा मृत्यू

sakal_logo
By

म्हाळुंगेत ४० फुटांवरून पडून
परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

साखर कारखान्यात दुरुस्ती करताना घटना; ठेकेदार, सुपरवायझर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ४ ः म्हाळुंगे (ता. चंदगड) येथील खासगी साखर कारखान्यात दुरुस्तीच्या कामासाठी शिडीवरून चढताना हात निसटून ४० फूट खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. सतरुधन कुमार (वय २०, रा. टिकमपारता, उत्तर प्रदेश) असे त्याचे नाव आहे. शनिवारी (ता. ३) सायंकाळी ही दुर्घटना घडली.
या प्रकरणी कामगरांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल ठेकेदार राजकिशोर भास्कर कणसे (शेनोली, जि. सातारा) व सुपरवायझर राजाराम ईश्वर पाटील (शिरगाव, ता. राधानगरी) यांच्यावर येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
कारखान्यात सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. सतरुधन हा आरबीसी दुरुस्तीच्या कामासाठी शिडीवरून चढत होता. ४० फुटांवर गेला असता अचानक हात निसटून तो खाली पडला. नाका- तोंडातून रक्त येऊन बेशुद्ध पडला. सुपरवायझर पाटील याने कारखान्याच्या मोटारीतून बेळगाव येथील रुग्णालयात त्याला नेले. तेथील डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. मात्र, ठेकेदार कणसे याच्या सांगण्यावरून मृतदेह कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात नेला. तिथेही डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले. उपचारावेळी योग्य माहिती न देता, तो अपघातात जखमी झाल्याची खोटी माहिती दिली. त्यावरून कणसे याने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य साधने पुरवण्याकडे दुर्लक्ष केले. तो मृत झाल्यावर पोलिसांना कळवणे गरजेचे असताना कळवले नाही. तर सुपरवायझर पाटील यानेही आरोग्य अधिकारी व पोलिसांना चुकीची माहिती दिल्याबद्दल या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक पाटील तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02050 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..