चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या
चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या

चंदगड परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

01654
डुक्करवाडी : बागिलगे-डुक्करवाडी विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात बोलताना प्राचार्य एस. एस. तुर्केवाडकर.

बागिलगे- डुक्करवाडी विद्यालयाच्या
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
चंदगड : डुक्करवाडी (ता. चंदगड) येथील बागिलगे-डुक्करवाडी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. प्राचार्य एस. एस. तुर्केवाडकर अध्यक्षस्थानी होते. एम. एन. शिवणगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्राचार्य तुर्केवाडकर, ए. बी. नाईकवाडी, ए. डी. सांबरेकर, पी. जे. बोकडे यांनी शाळेच्या प्रगतीबाबत माहिती दिली. शैक्षणिक कामकाज, शालेय सुविधा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, संस्कार वर्ग या माध्यमातून शाळेत विविध उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्वनाथ पाटील, हणमंत तुर्केवाडकर, रमेश शिवणगेकर, अविनाश पाटील, संतोष कुंभार, विलास नाईक, दिलीप आवडण यांनी चर्चेत सहभाग घेतला. शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान करताना आवश्यक सूचनाही केल्या. आर. जी. शिवणगेकर यांनी सूत्रसंचालन केले. एस. जी. पाटील यांनी आभार मानले.
---------------
चव्हाण पाटील विद्यालयात दूरस्थ व ऑनलाइन केंद्र
चंदगड : पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील व्ही. के. चव्हाण पाटील विद्यालयात शिवाजी विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राला परवानगी मिळाली. प्राचार्य यू. डी. पाटील यांनी ही माहिती दिली. त्यामुळे परिस्थितीअभावी उच्च शिक्षण न घेता आलेले विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी, सैनिक, उद्योजक, शेतकरी, कामगार यांना लाभ होणार आहे. बी. ए., बी.कॉम., एम.ए., एम.कॉम. हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. २०२२-२३ साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02056 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..