संकलन केलेल्या निर्माल्याचे खत तयार करणार : बोडरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संकलन केलेल्या निर्माल्याचे खत तयार करणार : बोडरे
संकलन केलेल्या निर्माल्याचे खत तयार करणार : बोडरे

संकलन केलेल्या निर्माल्याचे खत तयार करणार : बोडरे

sakal_logo
By

01660
म्हाळेवाडी : येथे निर्माल्य संकलन करताना ग्रामपंचायतीचे कर्मचारी.

संकलन केलेल्या निर्माल्याचे
खत तयार करणार : बोडरे
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ७ : तालुक्यात सर्वत्र घरगुती गौरी-गणेशाचे विसर्जन झाले. जलप्रदूषण टाळण्यासाठी पंचायत समितीकडून केलेल्या आवाहनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. ६४ हजार ७६९ किलो निर्माल्य संकलन करण्यात आले. या निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करावे, अशा सूचना संबंधित ग्रामपंचायतींना दिल्या असल्याचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी सांगितले.
जल प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने या वर्षी पंचायत समितीच्या विभागाने सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते. त्यानुसार ग्रामपंचायतींनीही गावपातळीवर योग्य नियोजन राबवले. नागरिकांना निर्माल्य व पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याचे आवाहन केले. त्यानुसार अनेकांनी आढेवेढे न घेता निर्मळ मनाने त्याला सहकार्य केले. या वर्षी सर्वच ठिकाणी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान १३ हजार ७०९ मूर्तींचे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यात आले. काही नागरिकांनी घरच्या घरीच पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करून मातीचा वापर बगीचासाठी केला. काही गावातून दरवर्षी नवीन मूर्ती आणण्याऐवजी उत्सवासाठी खास मूर्ती खरेदी करुन तिचाच वापर करण्यात येत आहे. हे सर्व प्रयत्न पाहता नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी सजगता वाढत असून यापुढील काळात ती आणखी गती घेईल, असा विश्‍वास बोडरे यांनी व्यक्त केला. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी दोन घंटागाड्या व १४ ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला. काही ग्रामपंचायतींनी छकडा गाडीचा वापर केला. जमा केलेल्या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02059 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..