विमा प्रतिनिधींची चंदगडला निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमा प्रतिनिधींची चंदगडला निदर्शने
विमा प्रतिनिधींची चंदगडला निदर्शने

विमा प्रतिनिधींची चंदगडला निदर्शने

sakal_logo
By

01681
चंदगड : विमा प्रतिनिधींनी विविध मागण्यांसाठी आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.


विमा प्रतिनिधींची
चंदगडला निदर्शने
चंदगड, ता. ८ : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या येथील कार्यालयासमोर विमा प्रतिनिधींनी विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने निदर्शने केली.
विमा हप्त्यावरील जीएसटी रद्द करावा, विम्यावर घेतलेल्या कर्जाचा व्याजदर कमी करावा, पाच वर्षांपेक्षा जास्त काळ बंद असलेल्या विमा पॉलिसी सुरू कराव्या, विमा प्रतिनिधींसाठी पेन्शन व प्रॉव्हिडंट फंडची व्यवस्था करावी, पॉलिसी धारकांनी दावा न केलेल्या रकमा सामाजिक सुरक्षा ठेवीमध्ये वर्ग करू नये, पुन्हा पुन्हा केवायसी मागू नये, शासनाने विमा प्रतिनिधींना व्यावसायिक म्हणून दर्जा द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या. या वेळी आनंदा पाटील, विष्णू कंग्राळकर, आनंदा तोडकर, राजेंद्र पाटील, दयानंद पाटील, विलास पाटील, सीताराम पाटील, अशोक दळवी, गजानन राऊत यांच्यासह विमा प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02068 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..