चंदगडला माजी सैनिकांची संघटना स्थापण्याचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडला माजी सैनिकांची संघटना स्थापण्याचा निर्णय
चंदगडला माजी सैनिकांची संघटना स्थापण्याचा निर्णय

चंदगडला माजी सैनिकांची संघटना स्थापण्याचा निर्णय

sakal_logo
By

01732
मजरे कारवे : माजी सैनिकांच्या मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा झाली.

चंदगडला माजी सैनिकांची
संघटना स्थापण्याचा निर्णय
चंदगड, ता. १५ : मजरे कारवे (ता. चंदगड) येथे माजी सैनिकांची बैठक झाली. यावेळी तालुक्यातील माजी सैनिकांची संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तालुक्यात प्रत्येक गावात माजी सैनिकांची संख्या आहे. सेवेचा बराचसा कालावधी बाहेर घालवून ते गावाकडे आलेले असतात. बदलत्या स्थितीनुसार त्यांचे अनेक प्रश्न आहेत. समाजात सन्मानाची वागणूक मिळत नाही. १५ ऑगस्ट व २६ जानेवारीसारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांत त्यांना डावलले जाते, अशा तक्रारी मांडण्यात आल्या. शासनाकडून मिळणाऱ्या सेवा-सवलती तसेच सैनिक कल्याण मंडळाकडून मिळणारे लाभ याबाबत जागृती होणे आवश्यक असल्याची चर्चा झाली. माजी सैनिकांचा स्नेहमेळावा घेऊन सुसंवाद साधण्याचे ठरले. सैन्यात विविध पदांवर काम करून निवृत्त झालेले कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कपिल गवस यांनी या सर्वांना एकत्र केले होते. तालुक्यातील सर्व माजी सैनिकांचे नाव व मोबाईल क्रमांक एकत्र करून लवकरच मोठा मेळावा घ्यायचा आणि संघटना स्थापन करण्याचे ठरले. यावेळी जे. बी. चांदेकर, यशवंत धाऊसकर, चंद्रकांत गवस, मंजुनाथ, राजाराम गावडे, हरी गावडे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02094 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..