चंदगड संघ कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेस पाच लाख नफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगड संघ कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेस पाच लाख नफा
चंदगड संघ कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेस पाच लाख नफा

चंदगड संघ कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेस पाच लाख नफा

sakal_logo
By

चंदगड संघ कर्मचाऱ्यांच्या
पतसंस्थेस पाच लाख नफा
चंदगड, ता. १४ : चंदगड तालुका खरेदी विक्री संघ सेवकांच्या पतसंस्थेस गेल्या आर्थिक वर्षात पाच लाख १६ हजार रुपयांचा नफा झाला. नफा वाटपाची तरतूद करताना सभासदांना दहा टक्के लाभांश देणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष एस. वाय. पाटील यांनी जाहीर केले. संस्थेची ४० वी वार्षिक सभा शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील संघाच्या दाणेदार खत कारखान्याच्या सभागृहात झाली.
प्रारंभी माजी आमदार कै. नरसिंग गुरुनाथ पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सचिव डी. एस. गावडे यांनी संस्थेचा अहवालवाचन केले. विषयपत्रिका, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक वाचन केले. सभासदांनी विचारलेल्या प्रश्‍नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली. संस्थेचे अधिकृत भागभांडवल १५ लाख रुपये असून वसूल भागभांडवल ४० लाख रुपये असलेने संस्थेच्या पोटनियमात बदल करून एक कोटी रुपयांपर्यंत मर्यादा वाढवण्याचा ठराव झाला. सभासदांची कर्ज मर्यादा दोन लाखांवरून पाच लाख रुपये करण्याचे ठरले. या संदर्भातील पोटनियमांना सहकार खात्याकडून मंजुरी मिळताच त्याची ताबडतोब कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन अध्यक्ष पाटील यांनी दिले. तालुका संघाचे संचालक तानाजी गडकरी, जानबा चौगुले, रामचंद्र बेनके, विठ्ठल पावले यांनी मार्गदर्शन केले. संचालक अनिल उंबळकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02096 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..