चंदगड संघाची 24 रोजी सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगड संघाची 24 रोजी सभा
चंदगड संघाची 24 रोजी सभा

चंदगड संघाची 24 रोजी सभा

sakal_logo
By

चंदगड संघाची २४ रोजी सभा
चंदगड ः यशवंतनगर (ता. चंदगड) येथील चंदगड तालुका खरेदी विक्री संघाची ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. २४) रोजी होत आहे. संस्थेच्या शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) औद्योगिक वसाहतीतील गाय छाप दाणेदार खत कारखान्याच्या सभागृहात ही सभा होईल. संस्थेचे व्यवस्थापक एस. वाय. पाटील यांनी ही माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष आमदार राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत विविध विषयांवर चर्चा होणार आहे. यामध्ये माजी आमदार कै. नरसिंग गुरुनाथ पाटील यांच्या स्मारक उभारणीसाठी संघाची यशवंतनगर येथील खुली जागा लिजवर देणेबाबत विचारविनिमय होणार आहे. त्याशिवाय अन्य विषयांवर चर्चा होणार आहे. संस्था प्रतिनिधींनी सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02097 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..