वाणिज्य शाखेत नोकरीच्या अनेक संधी : प्रकाश धनुक्षे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाणिज्य शाखेत नोकरीच्या अनेक संधी : प्रकाश धनुक्षे
वाणिज्य शाखेत नोकरीच्या अनेक संधी : प्रकाश धनुक्षे

वाणिज्य शाखेत नोकरीच्या अनेक संधी : प्रकाश धनुक्षे

sakal_logo
By

01739
हलकर्णी : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रकाश धनुक्षे.

वाणिज्य शाखेत नोकरीच्या
अनेक संधी : प्रकाश धनुक्षे
चंदगड : वाणिज्य शाखेतून पदवीधर झालेल्या तरुणांना नोकरीच्या अनेक संधी आहेत, असे मत मुंबई येथील जीपीआर कॉर्पोरेशन एक्झिम मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे समन्वयक प्रकाश धनुक्षे यांनी मांडले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागामार्फत हा कार्यक्रम झाला. धनुक्षे म्हणाले, ‘‘शिक्षणाचा वापर जीवनात करायला शिका. वाणिज्य शाखेच्या पदवीधरांना आयात-निर्यात, व्यवस्थापन क्षेत्रात नोकरीच्या संधी आहेत. पदवी शिक्षणाबरोबरच इतर कौशल्यही आत्मसात करायला हवीत.’’ प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, प्रा. पी. ए. पाटील, डॉ. राजेश घोरपडे यांनीही मार्गदर्शन केले. अभिजित चव्हाण, सुजित पाटील यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. वाणिज्य विभागप्रमुख प्रा. जी. जे. गावडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पी. जी. कांबळे यांनी स्वागत केले. डॉ. जयश्री पाटील यांनी आभार मानले. एम. एन. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02099 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..