माणकेश्‍वर पतसंस्थेतर्फे पंधरा टक्के लाभांश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माणकेश्‍वर पतसंस्थेतर्फे पंधरा टक्के लाभांश
माणकेश्‍वर पतसंस्थेतर्फे पंधरा टक्के लाभांश

माणकेश्‍वर पतसंस्थेतर्फे पंधरा टक्के लाभांश

sakal_logo
By

01756
माणगाव : माणकेश्‍वर पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना अध्यक्ष एस. आर. पाटील. शेजारी उपाध्यक्ष एस. बी. पाटील व इतर.

माणकेश्‍वर पतसंस्थेतर्फे
पंधरा टक्के लाभांश
माणगाव, ता. २१ : माणगाव (ता. चंदगड) येथील माणकेश्‍वर पतसंस्थेच्या सभासदांना पंधरा टक्के लाभांश देण्याची घोषणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस. आर. पाटील यांनी केली. संस्थेच्या ४४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
उपाध्यक्ष एस. बी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. गेल्या आर्थिक वर्षात नऊ लाख ५२ हजार रुपये नफा झाल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. ज्येष्ठ सभासद रामलिंग वाघराळे, मल्लवा व्हन्याळकर, यमाजी गावडे, माऊली पट्टेकर, रामचंद्र कडोलकर, विष्णू देवण, हरिभाऊ पाटील यांचा सत्कार झाला. एम. टी. कांबळे, आय. के. स्वामी, प्रमोद मधाळे, प्रकाश टक्केकर, जी. के. पाटील यांचा निवृत्तीबद्दल, तर गुणवंत विद्यार्थी दिशा बेनके, अनिकेत होणगेकर, सृष्टी किल्लेदार, सलोनी बिर्जे, पियुष फडके, साक्षी मातोंडकर यांचाही सत्कार झाला. आनंदी हारकारे, पार्वती माने, प्रकाश कांबळे, आनंदी पाटील, लक्ष्मी रामगावडे, यल्लूबाई मेटकर या सभासदांच्या वारसांना निधीचे वाटप झाले. व्यवस्थापक रामचंद्र बेनके यांनी अहवाल वाचन केले. ज्ञानदेव पाटील, मारुती अर्जुनवाडकर, हरिभाऊ पाटील, शिवाजी होणगेकर यांनी चर्चेत सहभाग घेतला. एस. एम. शिवणगेकर, हळदणकर, शांताराम पाटील, एन. डी. माने, युवरा कुट्रे, गजानन कुंभार, नारायण रोड, पांडुरंग चव्हाण, शिवाजी पिटूक, सुनंदा किल्लेदार, सुनीता पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते. संचालक अरुण होणगेकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02108 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..