हेरे सरंजाममधील कुळांनी परीपूर्ण प्रस्ताव पाठवावे ः तहसिलदार रणावरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हेरे सरंजाममधील कुळांनी परीपूर्ण प्रस्ताव पाठवावे ः तहसिलदार रणावरे
हेरे सरंजाममधील कुळांनी परीपूर्ण प्रस्ताव पाठवावे ः तहसिलदार रणावरे

हेरे सरंजाममधील कुळांनी परीपूर्ण प्रस्ताव पाठवावे ः तहसिलदार रणावरे

sakal_logo
By

हेरे सरंजाममधील कुळांनी परिपूर्ण
प्रस्ताव पाठवावेत ः तहसीलदार रणावरे
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ६ ः तालुक्यातील हेरे सरंजाम अंतर्गत ज्या कुळांना अद्याप जमिनीचा मालकी हक्क मिळालेला नाही. त्यांनी परिपूर्ण प्रस्ताव तयार करून महसूल प्रशासनाकडे पाठवावा, असे आवाहन तहसीलदार विनोद रणावरे यांनी केले आहे.
हेरे सरंजाम अंतर्गत पिढ्यान्‌पिढ्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना कूळ वहिवाटीने मालकी हक्क मिळावा, यासाठी तत्कालीन आमदार (कै.) नरसिंगराव पाटील यांनी शासन आदेश करून घेतला होता. मात्र विविध कारणांनी अजूनही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. आमदार राजेश पाटील यांनी यासंदर्भात बैठक घेऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केल्यानंतर प्रशासनाने गती घेतली आहे. ज्यांनी परिपूर्ण प्रस्ताव पाठवले त्यांचे काम पूर्ण झाले मात्र, ज्यांचे प्रस्ताव अपुरे आहेत ते रखडल्याचे रणावरे यांनी सांगितले. यामध्ये फेरफार उतारा मृताचा वारसा नाही, एकत्रीकरणाच्या उताऱ्याचा मेळ बसत नाही, सातबारा पत्रकी बनावट खातेदारांची नावे, फेरफार व पीक पाहणीमध्ये खाडाखोड, अर्जदाराच्या नावे बोगस सहीने तसेच मृत व्यक्तीच्या नावे प्रस्ताव दाखल करणे असे प्रकार आहेत. त्यामुळे प्रकरणांचे निर्गतीकरण करण्यास विलंब लागत आहे. खातेदारांनी योग्य कागदपत्रासह परीपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास त्वरीत त्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असेही रणावरे यांनी स्पष्ट केले. आपल्या भागाचे तलाठी, मंडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून योग्य ती कागदपत्रे उपलब्ध करुन परीपूर्ण प्रस्ताव पाठवावे असे आवाहन त्यांनी केले आहे.