आमदार पाटील पत्रकारपरीषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार पाटील पत्रकारपरीषद
आमदार पाटील पत्रकारपरीषद

आमदार पाटील पत्रकारपरीषद

sakal_logo
By

‘दौलत’ वर २०१७ पासूनच अवसायक
आमदार राजेश पाटील, आमदार बेनके यांच्यावरील आरोप चुकीचा
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ९ ः दौलत साखर कारखान्यावर २०१७ लाच अवसायकाची नियुक्ती झाली आहे. जिल्हा निबंधकांना ही जबाबदारी देण्यात आली. परंतु अद्याप एकाही जिल्हा निबंधकाने ही जबाबदारी न स्वीकारल्याने कार्यवाही झाली नाही. आमदार अनिल बेनके यांनी त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केंद्रीय निबंधकांकडे थकीत देण्याची मागणी केली आहे. परंतु त्यांच्या मागणीचा विपर्यास्त करुन चुकीचा आरोप केला जात असल्याचे स्पष्टीकरण आमदार राजेश पाटील यांनी दिले. शिनोळी (ता. चंदगड) येथे तालुका संघाच्या खत कारखान्याच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
अवसायक येण्यापूर्वीच जिल्हा बॅंकेने हा कारखाना खासगी कंपनीला चालवायला दिला. त्यामुळे अवसायकाची कार्यवाही थांबल्याने हा कारखाना जिवंत राहिला. त्याचे स्वागतच करायला हवे असे सांगून ते म्हणाले, ‘चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागातील साखर कारखाने सहकारातच चालायला हवेत. त्यासाठी कारखान्यावरील अवसायक हटवणे, पंचवार्षिक निवडणूक लावणे आणि मंत्री समितीच्या नियमानुसार जास्तीत जास्त पंधरा वर्षाच्या कराराने कारखाना चालवायला देणे यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
......

सेटलमेंट बहाद्दरांनी आरोप करु नयेत
आमदार पाटील यांच्यावर काही विरोधकांनी कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आरोप केले होते. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, कारखान्याला उसाचे खांडेही न पुरवणाऱ्या आणि पाकीट संस्कृती जोपासणाऱ्या सेटलमेंट बहाद्दरांनी आमच्या भूमिकेवर शंका घेऊ नये. त्याऐवजी त्यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. जनतेला सर्व काही कळते.