वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांची तत्परता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांची तत्परता
वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांची तत्परता

वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांची तत्परता

sakal_logo
By

वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांची तत्परता
चंदगड ः मळवी (ता. चंदगड) परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या ढगफुटीमुळे प्राथमिक शाळेसमोरील वीजेचा खांब तळातून मोडून पडला. त्या दिवशी शाळेला सुटी असल्यामुळे विद्यार्थी उपस्थित नव्हते. या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य मनोहर कणगुटकर, रामलिंग पाटील, लक्ष्मण पाटील, मुरारी मोहिते यांनी ग्रामस्थांना सुरक्षेबाबत कल्पना दिली. तातडीने वीज वितरण कंपनीशी संपर्क साधून माहिती दिली. दुसऱ्याच दिवशी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नवीन खांब उभा करून वीजपुरवठाही सुरळीत केला. त्यांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.
------------------------------
शैक्षणिक धोरण कार्यशाळा
चंदगड ः पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील व्ही. के. चव्हाण पाटील महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर कार्यशाळा झाली. प्राचार्य डॉ. यू. डी. पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रा. पी. एस. कांबळे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. पाटील यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती दिली. प्रा. के. बी. कलजी, प्रा. सी. एल. गावडे, प्रा. पी. एन. इंजल, अधीक्षक युवराज पाटील आदी उपस्थित होते. प्रा. ए. टी. आपके यांनी प्रास्ताविक केले. प्रा. विलास नाईक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विजय गावडे यांनी आभार मानले.