खोराटेंवर जातीवाचक गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोराटेंवर जातीवाचक गुन्हा
खोराटेंवर जातीवाचक गुन्हा

खोराटेंवर जातीवाचक गुन्हा

sakal_logo
By

खोराटे यांच्यावर जातीवाचक गुन्हा

चंदगड, ता. २८ ः अथर्व इंटरट्रेड कंपनीचे मालक मानसिंग खोराटे व त्यांचा मुलगा पृथ्वी यांच्यावर येथील पोलिसांत जातीवाचक गुन्हा दाखल झाला आहे. अथर्व कंपनी संचलित दौलत कारखान्याचे कामगार गणपत खेमान्ना कांबळे (रा. कोरज, ता. चंदगड) यांनी फिर्याद दिली आहे. कांबळे हे कारखान्याकडे डिस्टीलरी विभागात हेल्पर म्हणून काम करतात. मात्र त्यांची बदली वॉचमन म्हणून करण्यात आल्याचे समजल्यावर याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता खोराटे यांनी जातीवाचक शिवी देत बदली केलेल्या ठिकाणी तुला जावे लागेल, असे दटावले. पृथ्वी यानेही जातिवाचक शिवीगाळ करून अध्यक्षांनी सांगितलेले तुला समजत नाही का, असे म्हणत गेटच्या बाहेर निघून जाण्यास सांगितले, असे फिर्यादीत म्हटले आहे.