चंदगड अर्बन चषक क्रिकेट स्पर्धेला सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगड अर्बन चषक क्रिकेट स्पर्धेला सुरवात
चंदगड अर्बन चषक क्रिकेट स्पर्धेला सुरवात

चंदगड अर्बन चषक क्रिकेट स्पर्धेला सुरवात

sakal_logo
By

01926
-------

चंदगड अर्बन चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २८ ः येथील चंदगड अर्बन चषक क्रिकेट स्पर्धेला काल (ता. २७)पासून सुरुवात झाली. दि न्यू इंग्लिश स्कूलच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर स्पर्धेचे उद्‍घाटन माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या हस्ते झाले. नगराध्यक्षा प्राची काणेकर, उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, बॅंकेचे अध्यक्ष दयानंद काणेकर, उपाध्यक्ष बाबूराव हळदणकर, ‘सीईओ’ अरुण चौगुले आदी प्रमुख उपस्थित होते.
दहा षटकांच्या या स्पर्धेसाठी ३२ मर्यादित संघ आहेत. चंदगड, आजरा, गडहिंग्लजसह बेळगाव, सिंधुदुर्ग, गोवा परिसरातून संघ दाखल झाले. स्पर्धेसाठी ७१ हजार, ४१ हजार, २१ हजार, ११ हजार तसेच मॅन ऑफ दि मॅच, मॅन ऑफ दि सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज अशी दीड लाखाहून अधिक रकमेची बक्षिसे आहेत. उद्‍घाटनप्रसंगी भरमूअण्णा पाटील म्हणाले, की खेळामुळे व्यक्तिमत्त्व विकास होतो. वाढती व्यसनाधीनता आणि त्यामुळे निर्माण होणारे शारीरिक रोग पाहता खेळाचे महत्त्व अनन्यसाधाण आहे. दयानंद काणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. अरुण पिळणकर, बाबूराव हळदणकर, सचिन बल्लाळ, नगरसेविका अनिता परीट, माधुरी कुंभार, नेत्रदीपा कांबळे, राजेंद्र परीट, दिलावर सय्यद, झाकीर नाईक उपस्थित होते. व्यवस्थापक नौशाद मुल्ला यांनी आभार मानले.