मानसिंग खोराटे प्रेसनोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानसिंग खोराटे प्रेसनोट
मानसिंग खोराटे प्रेसनोट

मानसिंग खोराटे प्रेसनोट

sakal_logo
By

५९ जणांना वगळून कारखाना सुरू
करण्यास तयार ःमानसिंग खोराटे

चंदगड, ता. ३ ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व- दौलत कारखान्यावर दगडफेक करणाऱ्या ५९ कामगारांना वगळून उर्वरित ५३६ कर्मचारी कामावर हजर झाल्यास आजही कारखाना सुरू करण्यास तयार आहोत, अशा आशयाचे पत्रक कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी प्रसिद्घीस दिले. सिटू संघटनेकडून तालुक्याची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
दीर्घकाळ बंद पडलेला हा कारखाना अथर्व कंपनीने तीन हंगाम व्यवस्थितपणे पार पाडून शेतकऱ्यांचा, तोडणी- वाहतूकदारांचा आणि कारखान्याचे हित जोपासणाऱ्या कामगारांचा विश्वास संपादन केला आहे. परंतु, कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे कारखाना चालवणे अवघड झाले असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या खोटारडेपणाला अन्य कामगारही बळी पडत आहेत. मंगळवारी (ता. १) कारखाना स्थळावर झालेल्या बैठकीत ५९ कामगारांना वगळून कारखाना सुरू करण्याची स्पष्ट भूमिका अथर्व प्रशासनाने घेतली; परंतु त्याला संघटनेच्या पदाधिकारी व इतर नेते मंडळींनी विरोध केला. निलंबित कर्मचाऱ्यांना कामावर घेतले नाही तर कारखाना बंद पाडू, अशी त्यांनी भूमिका घेतली. बैठक झाल्यानंतर कामगारांची बैठक झाली. त्यामध्ये ५९ जण बाहेर थांबण्यास तयार असतानाही कंपनी कारखाना सुरू करत नाही, असे खोटे सांगण्यात आले. त्यामुळे सीटू संघटना शेतकरी, तोडणी, वाहतूकदार आणि कामगारांची फसवणूक करीत असल्याचे पत्रकात स्पष्ट केले आहे. ५९ कर्मचारी सोडून इतर ५३६ कर्मचाऱ्यांना आजही कारखान्याचे प्रवेशद्वार खुले आहे. त्यांनी हजर होऊन शेतकरी आणि तोडणी, वाहतूकदारांचे हित जपावे, असे आवाहन पत्रकातून केले आहे.