कामगार संघटना निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगार संघटना निवेदन
कामगार संघटना निवेदन

कामगार संघटना निवेदन

sakal_logo
By

अथर्व कंपनीने आत्मपरीक्षण करावे

प्रा. सुभाष जाधव, कामगारांत फूट पाडत असल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ४ ः दौलत-अथर्व कारखाना सुरू करण्यासंदर्भात कंपनीकडून संघटनेवर आरोप केले जात आहेत. परंतु, त्यांनी आपल्या आडमुठ्या भूमिकेचे आत्मपरीक्षण करावे, अशी सूचना सिटू संघटनेचे प्रा. सुभाष जाधव यांनी केली आहे. प्रसिद्धिपत्रकातून त्यांनी संघटनेची भूमिका मांडली आहे.
पत्रकात म्हटले आहे, तीन वर्षे कंपनीने कामगारांना पगारवाढ, वाढीव महागाई भत्ता, ओव्हरटाईमचे पैसे दिले नाहीत. बोनस दिला नाही. मागण्यांचे पत्र दिल्यावर हुद्दा डावलून बदल्या करण्यात आल्या. कामगारांत फूट पाडण्यासाठी दुसरी युनियन तयार करण्यासाठी काही कामगारांवर दबाव आणला. कंपनीचा हा डाव लक्षात आल्याने कामगारांनी सिटू संघटनेचा आधार घेतला. सिटू संघटनेने मागण्यांबाबत चर्चेची मागणी केली असता चर्चा टाळली. त्यामुळे संपाचे हत्यार उपसावे लागले. पगारवाढ मान्य केल्याने संप मागे घेतल्यानंतर सलग २४ दिवस कामगारांनी सुटी न घेता गळीत हंगामाची संपूर्ण कामे पूर्ण केली. फॅक्टरी इन्स्पेक्टरची परवानगी न घेताच शिफ्ट चार्ट लागू केला. वेळाने आलेल्या कामगारांना प्रवेशद्वारावरच अडवण्यात आले. त्यामुळे उद्रेक झाला. निलंबित ५९ कामगारांना कामावर घेणारच नाही, अशी भूमिका कंपनीने घेतली आहे. चर्चेला प्रतिसाद न देणे, शिवराळ भाषा, अरेरावी यामुळेच कारखान्याचा प्रश्न चिघळला आहे.