चंदडमध्ये १०९ गावात आज विशेष ग्रामसभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदडमध्ये १०९ गावात आज विशेष ग्रामसभा
चंदडमध्ये १०९ गावात आज विशेष ग्रामसभा

चंदडमध्ये १०९ गावात आज विशेष ग्रामसभा

sakal_logo
By

चंदगडमध्ये १०९ गावांत
आज विशेष ग्रामसभा
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ९ ः तालुक्यातील १०९ ग्रामपंचायतींत उद्या (ता. १०) विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत तहसीलदार विनोद रणावरे यांच्या आदेशानुसार या ग्रामसभा होत आहेत. या वेळी प्रारूप मतदार यादी पाहण्यासाठी उपलब्ध केली जाणार आहे. त्यावर हरकती, नोंदीमध्ये दुरुस्ती असल्यास तिथेच विहीत नमुन्यातील अर्ज भरून द्यायचे आहेत.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अस्तित्वात असलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती केली जाते. तालुक्यातील १९८ मतदान केंद्रांवर १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबरला याबाबत नियोजन राबविले. १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांची नोंदणी, दुरुस्ती, मयत, दुबार, स्थलांतरित मतदारांना वगळण्यात आले. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक घराला भेट देऊन मतदान ओळखपत्र आधार कार्डला कसे जोडावे, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान, कोवाड, चनेहट्टी, यर्तनहट्टी व बुक्कीहाळ येथील मतदान ठिकाणात बदल आहेत. आमरोळी, लाकूरवाडी, जंगमहट्टी व शिनोळी बुद्रुक यांच्या नावात बदल आहेत. त्यांचे सुसूत्रीकरण प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविले. त्याला त्यांनी मान्यताही दिली आहे. उद्याच्या ग्रामसभेत अधिकाधिक ग्रामस्थांनी सहभागी होऊन मतदार नाव नोंदणी करावी, असे आवाहन रणावरे यांनी केले आहे.