पारगडच्या तटबंदीला लागून रस्ता नको | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारगडच्या तटबंदीला लागून रस्ता नको
पारगडच्या तटबंदीला लागून रस्ता नको

पारगडच्या तटबंदीला लागून रस्ता नको

sakal_logo
By

पारगडच्या तटबंदीला लागून रस्ता नको
पारगडवीसांचे निवेदन; सर्व्हे बदलून नियोजन करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १३ ः किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे गडाच्या पायथ्याला लागूनच सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे बांधकाम धरले आहे. परंतु त्यामुळे तटबंदीला धोका निर्माण होऊ शकतो. हा सर्व्हे बदलून नवीन सर्व्हे करावा व रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी पारगड ग्रामस्थांनी केली आहे.
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारा पारगड- मोर्ले रस्त्याचे काम रखडले आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, पालकमत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. दरम्यान, या रस्त्याचा कोल्हापूर हद्दीतील सर्व्हे बांधकाम विभागाकडून केला असून तटबंदीला लागूनच रस्ता होणार आहे. तो बदलावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. दोन वर्षांपासून बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि किल्‍ल्याच्या पायथ्याला काम थांबले तर त्याची जबाबदारी बांधकाम विभागाची असेल. याची दखल घेऊन तातडीने सर्व्हे बदलावा व नवीन जागेतून रस्ता घ्यावा, अशी मागणी सरपंच संतोष पवार, रघुवीर शेलार, प्रकाश चिरमुरे, विद्याधर बाणे, प्रकाश पवार, मनोहर पवार, अर्जून तांबे, धोंडिबा बोर्डे यांनी केली आहे.