हलकर्णी महाविद्यालयात व्याख्यानमाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हलकर्णी महाविद्यालयात व्याख्यानमाला
हलकर्णी महाविद्यालयात व्याख्यानमाला

हलकर्णी महाविद्यालयात व्याख्यानमाला

sakal_logo
By

फोटो chd164.jpg
02049
हलकर्णी : डॉ. नंदकुमार मोरे यांचा सत्कार करताना विशाल पाटील. शेजारी प्राचार्य अजळकर, डॉ. अनिल गवळी, डॉ. राजेश घोरपडे.
---------------------
सभोवतालचे निरीक्षण हेच संशोधन
डॉ. नंदकुमार मोरे; हलकर्णी महाविद्यालयात ज्ञानविस्तार मानव्य व्याख्यानमाला

चंदगड, ता. १६ : ‘संशोधन कुतूहलातून निर्माण होते. सभोवतालाचे कुतूहलपूर्वक, जिज्ञासापूर्वक निरीक्षण करा. या निरीक्षणातूनच संशोधनासाठी विषय प्राप्त होतील, असे मत शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी मांडले. शिवाजी विद्यापीठ आणि हलकर्णी ( ता. चंदगड ) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्ञानविस्तार मानव्य व्याख्यानमाला झाली. या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. सचिव विशाल पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. मोरे  म्हणाले, ‘शाळा-महाविद्यालयाचे दिवस आनंददायी असतात. या काळात खूप वाचन, निरीक्षण करावयास हवे. येथेच भावी आयुष्याच्या वाटा ठरतात. उच्चशिक्षण आणि संशोधनाची दिशा निश्चित होत असते.’ नवीन शैक्षणिक धोरणात प्रादेशिक भाषा व बोलीत मुलांना शिकविले पाहिजे, असा या आग्रह आहे, त्यामुळे नवीन पिढीतील विद्यार्थ्यांनी या सर्व गोष्टींचा फायदा घेऊन उच्चशिक्षण घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. विशाल पाटील म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी पदवीबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात करून व्यक्तिमत्व विकसित करावे.’ संस्था उपाध्यक्ष संजय पाटील, प्राचार्य डॉ. बी . डी. अजळकर, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. अनिल गवळी, डॉ. आय. आर. जरळी, प्रा. यू. एस. पाटील, प्रा. व्ही. व्ही. कोलकार, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. एस. एन. पाटील, प्रा. के. एम. गोनुगडे, डॉ. राजेश घोरपडे, डॉ. ज्योती व्हटकर उपस्थित होते. प्रा. एस. एन. खरुजकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा.पी. ए. पाटील यांनी आभार मानले. डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी सूत्रसंचालन केले.