ऑक्सीजन प्लांटचे काम रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्सीजन प्लांटचे काम रखडले
ऑक्सीजन प्लांटचे काम रखडले

ऑक्सीजन प्लांटचे काम रखडले

sakal_logo
By

02086
चंदगड : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन प्लांटची मशिनरी सहा महिन्यांपासून प्लॅटफॉर्मच्या प्रतीक्षेत आहे.
---------------------------
ऑक्सिजन प्लांटचे काम रखडले
चंदगडला सहा महिने मशिनरी पडून; नवीन आकारमानानुसार प्लॅटफॉर्म बांधण्याची गरज
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २२ : येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अंतर्गत केंद्र शासनाने ऑक्सिजन प्लांटला मंजुरी दिली. त्यासाठी आवश्यक मशिनरी आली आहे. मात्र ती बसवण्यासाठी प्लॅटफॉर्मचे बांधकाम तयार नसल्याने सहा महिन्यापासून काम रखडले आहे.
कोरोनात चंदगडसारख्या राज्याच्या एका टोकाला असलेल्या दुर्गम तालुक्यात ऑक्सिजन प्लांटची नितांत गरज असल्याची मागणी आमदार राजेश पाटील यांनी प्रशासनाकडे केली होती. त्यावेळी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी या प्लांटला मंजुरी दिली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात प्लॅटफॉर्म बांधकामही केले. दरम्यान केंद्र शासनानेही येथील गरज विचारात घेऊन ऑक्सिजन प्लांटला मंजुरी दिली. हैदराबाद येथील डेल कंपनीची मशिनरी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात आली आहे. मात्र या प्लांटचे आकारमान पूर्वी केलेल्या प्लॅटफॉर्मवर बसत नाही. त्यासाठी या नव्या प्लांटनुसार प्लॅटफॉर्म बांधकाम करणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाचा विषय काहीसा मागे पडल्यामुळे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कोट्यावधींची मशिनरी जागेवर पडून आहे.
------------------
ऑक्सीजन प्लांटची मशिनरी ही ओपनच असणार आहे. त्यामुळे वातावरणाचा तिच्यावर काही परिणाम होतोय असे म्हणता येणार नाही. प्लॅटफॉर्म बांधकामासाठी अंदाजपत्रकीय रकमेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला आहे. तेथून मंजुरी मिळतात बांधकाम केले जाईल.
- असीम मुलाणी, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम चंदगड