जगण्यासाठी चांगले पर्यावरण महत्त्वाचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जगण्यासाठी चांगले पर्यावरण महत्त्वाचे
जगण्यासाठी चांगले पर्यावरण महत्त्वाचे

जगण्यासाठी चांगले पर्यावरण महत्त्वाचे

sakal_logo
By

02088
चंदगड : अनिल चौगुले यांचे स्वागत करताना मुख्याध्यापक एन. डी. देवळे.
----------------------------------
जगण्यासाठी चांगले पर्यावरण महत्त्वाचे
अनिल चौगुले; न्यू इंग्लिश स्कूलची पर्यावरणपूरक शाळा म्हणून निवड
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २२ : माणसाला अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा आहेत त्याचबरोबर स्वच्छ पर्यावरण सुद्धा महत्त्वाचे असल्याचे मत निसर्गमित्र संस्थेचे संस्थापक अनिल चौगुले यांनी व्यक्त केले.
निसर्गमित्र संस्थेने येथील दि न्यू इंग्लिश स्कूलची पर्यावरणपूरक शाळा म्हणून निवड केली. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्याध्यापक एन. डी. देवळे अध्यक्षस्थानी होते. शाळेने राबवलेल्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे चौगुले यांनी कौतुक केले. घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास त्यातून आपल्याला लाभ मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले. त्यांनी कचऱ्यापासून सेंद्रिय खत व बायोगॅस निर्मिती, रद्दी कागदाच्या व जुन्या साडयांच्या कापडी  पिशव्या, निर्माल्यापासून रंग निर्मिती अशा विविध उपक्रमांची माहिती दिली. समन्वयक संजय साबळे यांनी स्वागत केले. टी. एस. चांदेकर, एम.व्ही.कानूरकर, शरद हदगल उपस्थित होते.