सदृढ आरोग्य हा जीवनाचा भक्कम पाया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदृढ आरोग्य हा जीवनाचा भक्कम पाया
सदृढ आरोग्य हा जीवनाचा भक्कम पाया

सदृढ आरोग्य हा जीवनाचा भक्कम पाया

sakal_logo
By

02104
चंदगड ः र. भा. माडखोलकर महाविद्यालयात मुलींच्या आरोग्य समस्या या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. स्नेहल मुसळे-पाटील. शेजारी प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील आदी.
--------------------------
सदृढ आरोग्य हा जीवनाचा भक्कम पाया
डॉ. स्नेहल मुसळे; माडखोलकर महाविद्यालयात व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २४ ः धकाधकीच्या जीवनात किशोरवयीन मुलींचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होत आहे. मात्र, आरोग्याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे. सदृढ आरोग्य हाच जीवनाचा भक्कम पाया आहे, असे मत डॉ. स्नेहल मुसळे-पाटील यांनी व्यक्त केले.
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात किशोरवयीन मुलींच्या आरोग्य समस्या या विषयावर त्या बोलत होत्या. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. दुसऱ्या सत्रात त्यांनी विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, ‘शिक्षणामुळे विविध क्षेत्रात मुली कार्यरत झाल्या आहेत. अशा वेळी कोणताही प्रसंग तरून नेण्यासाठी ऊर्जा महत्त्वाची आहे.’ डॉ. वृषाली हेरेकर, प्रा. मगळूरकर, डॉ. एम. एम. माने, डॉ. टी. ए. कांबळे, डॉ. भूपाल दिवेकर, डॉ. गंगासागर चोले, प्रा. उपलकर, प्रा. प्रियांका कांबळे, प्रा. पूजा पाटील, प्रा. लक्ष्मी करजगे, प्रा. अश्विनी पाटील आदी उपस्थित होते. समन्वयक प्रा. डॉ. एस. एस. सावंत यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आर. ए. कमलाकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पी. एल. भादवणकर यांनी आभार मानले.