विविध उपक्रमांनी संविधान दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विविध उपक्रमांनी संविधान दिन
विविध उपक्रमांनी संविधान दिन

विविध उपक्रमांनी संविधान दिन

sakal_logo
By

02127
किणी : संविधान गुणगौरव परीक्षेतील सहभागी परीक्षार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

विविध उपक्रमांनी संविधान दिन
चंदगड : तालुक्यात सर्वत्र संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा झाला. या निमित्ताने संविधानावर चर्चासत्र, व्याख्याने, भित्तीपत्रक, चित्र प्रदर्शन, संविधान गुणगौरव परीक्षा आदी कार्यक्रम झाले.

महादेवराव बी. एड. कॉलेज
तुर्केवाडी : महादेवराव बी. एड. कॉलेजमध्ये प्राचार्य एन. जे. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा झाला. भारताची एकात्मता आणि अखंडता टिकवणारे संविधान हे सर्वोच्चस्थानी असल्याचे मत प्रा. ग. गो. प्रधान यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरण व चित्र प्रदर्शनाचे उदघाटन एस. आर. देशपांडे, अभिषेक पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष महादेव वांद्रे, प्राचार्य एस.पी. गावडे, प्राचार्य अमर पाटील, मनिषा सोहनी, व्ही. पी. गुरव, प्रा. सचिन कांबळे उपस्थित होते. उज्वला कांबळे यांनी प्रास्ताविक केले. मनोज जांबोटकर यांनी आभार मानले. सविता चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.

यशवंतराव चव्हाण महाविद्यालय
हलकर्णी : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संविधान दिन साजरा झाला प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर अध्यक्षस्थानी होते. चंदगड बार कौन्सिलचे सदस्य ऍड. एन. एन. गावडे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले. न्याय, समता, बंधूता, स्त्री- पुरुष समानता यासाठी संविधान महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले. प्रा. जि. जे. गावडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शाहू गावडे यांनी स्वागत केले. संविधान शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

सह्याद्री विद्यालय
हेरे : येथील सह्याद्री विद्यालयात संविधान दिन साजरा झाला. प्राचार्य यु. एल. पवार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेचे व संविधानाचे पूजन करण्यात आले. व्ही. एस.पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्वेता गवळी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. एफ. ए. मुल्ला यांनी सूत्रसंचालन केले. आर.पी. डुरे यांनी आभार मानले.

सामाजिक बहुउद्देशीय संस्था
किणी : येथील संविधान गुणगौरव समिती व परिवर्तन सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संविधान दिन साजरा झाला. या निमित्ताने संविधान गुणगौरव परीक्षा घेण्यात आली. किणी व माणगाव केंद्रावर झालेल्या परीक्षेत तालुक्यातील 60 परीक्षार्थी सहभागी झाले होते. त्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. दरम्यान संस्थेच्या कार्यालयात वैजनाथ उसणकर, एम. व्ही. कांबळे, नेवगीरे, संदीप कांबळे, शिवाजी कांबळे, वैशाली गणाचारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरवात झाली. संदीप गणाचारी यांनी संविधानाचे महत्व विषद केले.


आजरा महाविद्यालय
आजरा : येथील आजरा महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात झाला. उपप्राचार्य प्रा. डी. पी. संकपाळ अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. आनंद बल्लाळ भारतीय संविधान आणि सामाजिक न्याय या विषयावर बोलतांना म्हणाले, ‘‘सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विभिन्नता असलेल्या भारतीय समाजाला बांधुन ठेवण्याचे कार्य भारतीय संविधान करते. देशातील प्रत्येक नागरीकाना त्यांचे हक्क, स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीची ग्वाही देते. त्यामुळेच भारतीय संविधान हे सामाजिक न्यायाचा मुख्य आधारभूत स्त्रोत आहे.’’ प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे व कार्यालयीन अधिक्षक योगेश पाटील यांच्या हस्ते भारतीय संविधानाची ओळख या विषयीच्या भितीपत्रिकेचे उद्‍घाटन झाले. डॉ. अशोक बाचुळकर यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. डॉ. अविनाश वर्धन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. व्ही. टी. हाक्के यांनी सुत्रसंचालन व आभार मानले. समाजशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्यातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.