
शहीद जवानाच्या पत्नीचा आंदोलनाचा इशारा
फोटो chd१२.jpg
02151
चंदगड : महसूल विभागाच्या अधिकाऱ्याकडे निवेदन देताना श्रीमती शोभा पाटील यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी.
------------------------------
चंदगडला शहीद जवानाच्या
पत्नीचा आंदोलनाचा इशारा
चाळीस वर्षांपासून जमिनीचा ताबा मिळत नसल्याची तक्रार
चंदगड, ता. १ : येथील शहीद जवान कृष्णा शिवाजी पाटील यांना शासनाच्या सिलिंग योजनेतून मिळालेल्या जमिनीचा ताबा गेली चाळीस वर्षे मिळत नाही. याबाबत आठ दिवसांत महसूल विभागाने निर्णय घेऊन ताबा द्यावा; अन्यथा ९ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण आंदोलन करणार असल्याचा इशारा श्रीमती शोभा शिवाजी पाटील यांनी दिला. या संदर्भात त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
श्रीमती पाटील यांचे पती हवालदार कृष्णा पाटील १९८६ ला राजस्थान कोटा येथे सेवेत असताना हुतात्मा झाले. शासनाने त्यांना मरणोपरांत कीर्तीचक्र दिले. महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कारसुद्धा मिळाला. ते हयात असताना १९७६ मध्ये सिलिंग योजनेतून जमीन मिळाली. चाळीस वर्षे उलटली तरी महसूल विभागाने त्यांना जमिनीचा ताबा दिलेला नाही. यासंदर्भात आज त्यांनी माजी सैनिक संघटनेच्या माध्यमातून तहसीलदारांना निवेदन दिले. आठ दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा दिला. यावेळी संघटनेचे कुमार पाटील, संजय जाधव, रणजीत गावडे, दशरथ पाटील, राजाराम फडके, सुरेश दळवी, यशवंत पावसकर, चंद्रकांत गवस, जोतिबा पाटील, विठोबा गावडे, सुरेश मेटकुपी, सचिन सावंत उपस्थित होते.