
माडखोलकर जयंती साजरी
02158
कालकुंद्री : र. भा. माडखोलकर जयंतीनिमित्त प्रतिमेला अभिवादन करताना मुख्याध्यापक सुभाष बेळगावकर, सुनील कोंडुसकर, बी. ए. तुपारे आदी.
माडखोलकरांचे कार्य
उल्लेखनीय : बेळगावकर
सरस्वती विद्यालयात जयंती कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ४ : चंदगड तालुक्यात खेडूत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून र. भा. माडखोलकर यांनी केलेले शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे, असे मत मुख्याध्यापक सुभाष बेळगावकर यांनी व्यक्त केले. कालकुंद्री (ता. चंदगड) येथील सरस्वती विद्यालयात माडखोलकर यांची ९७ वी जयंती झाली. त्यावेळी ते बोलत होते. ‘सकाळ’चे बातमीदार सुनील कोंडुसकर प्रमुख पाहूणे होते.
ई. एल. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कोंडुसकर यांच्या हस्ते माडखोलकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेले युवराज जोशी, ऋतुजा तरवाळ, सुमीत पाटील, स्वराज पाटील, प्रथम पाटील, हर्षल कांबळे, निखिल मोरे, अंकुश पाटील, गौतम कांबळे, पंकज तोंडले, विकास पाटील, प्रशांत पाटील, अस्मिता पाटील, वर्षा लाड, मयुरी दिंडे, समृध्दी भांदुर्गे, विनायक पाटील, रुपाली पाटील, मयुरी मोरे, पृथ्वीराज सुतार तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक डी. एम. तेऊरवाडकर, ई. एल. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. एस. व्ही. जाधव, बी. ए. तुपारे, एन. जे. बाचूळकर, ए. ए. कुंभार, प्रशांत कोकीतकर, अमोल तरवाळ, गजानन तरवाळ, बबन तरवाळ, विनायक कांबळे, व्ही. जी. कांबळे, अनिल गुरव, डी. एस. बामणे, नीता कुंभार, अनिल हिशोबकर, रामा तलवार, विद्यार्थी उपस्थित होते.