मोफत आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत आरोग्य शिबिर
मोफत आरोग्य शिबिर

मोफत आरोग्य शिबिर

sakal_logo
By

फोटो chd26.jpg
02168
यशवंतनगर ः आरोग्य शिबिराचे उदघाटन करताना मान्यवर.
------------------------------
यशवंतनगरला आरोग्य तपासणी शिबिर
चंदगड ः यशवंतनगर (ता. चंदगड) येथील श्री दत्तकृपा ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर झाले. डॉ. गौरी गणपत्ये सावंतवाडी, डॉ. भालचंद्र देसाई गडहिंग्लज, डॉ. भूषण देसाई बेळगाव, डॉ. रवींद्र देसाई सांबरा, डॉ. संजय मुरकुटे, डॉ. संदीप शिंदे व डॉ. भरत कांबळे यशवंतनगर यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. काही रुग्णांना संदर्भसेवेबाबत मार्गदर्शन केले. सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत झालेल्या शिबिरात 306 जणांची तपासणी झाली. सिस्टर ज्योती, दुर्वा यांचे सहकार्य लाभले.