‘माडखोलकर’च्या ४१ जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘माडखोलकर’च्या ४१ जणांचे रक्तदान
‘माडखोलकर’च्या ४१ जणांचे रक्तदान

‘माडखोलकर’च्या ४१ जणांचे रक्तदान

sakal_logo
By

‘माडखोलकर’च्या ४१ जणांचे रक्तदान
चंदगड ः खेडूत शिक्षण संस्थेचे संचालक कै. र. भा. माडखोलकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात ४१ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व बेळगाव येथील ब्लड बॅंकेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांच्याहस्ते शिबिराचे उद्‌घाटन झाले. प्रमुख पाहुणे डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी रक्तदानाचे महत्त्‍व सांगितले. महाविद्यालयातील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबीन तपासणी केली. डॉ. एस. पी. बांदिवडेकर, एम. एम. तुपारे, अॅड. आर. पी. बांदिवडेकर, गोपाळ बोकडे, ब्लड बॅंकेचे विनायक मेणसे, बसवराज बेन्नी, नेहरु युवा केंद्राचे अमेय सबनीस आदी प्रा. संजय पाटील यांनी स्वागत केले. डॉ. के. एन. पाटील यांनी आभार मानले.