हलकर्णी महाविद्यालयाचे तावरेवाडीत श्रमसंस्कार शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हलकर्णी महाविद्यालयाचे 
तावरेवाडीत श्रमसंस्कार शिबिर
हलकर्णी महाविद्यालयाचे तावरेवाडीत श्रमसंस्कार शिबिर

हलकर्णी महाविद्यालयाचे तावरेवाडीत श्रमसंस्कार शिबिर

sakal_logo
By

हलकर्णी महाविद्यालयाचे
तावरेवाडीत श्रमसंस्कार शिबिर
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ११ : हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर तावरेवाडी (ता. चंदगड) येथे होणार आहे. १३ ते १९ पर्यंत चालणाऱ्या शिबिरात दैनंदिन कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. संस्थाध्यक्ष गोपाळराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या हस्ते शिबिराचे उद्‍घाटन होईल. त्यानंतर दररोज श्रमदान, प्रबोधनपर व्याख्याने, गटचर्चा व सर्वेक्षण आदी उपक्रम होतील. चंदगडचे दिवाणी न्यायाधीश अमृत बिराजदार यांचे ‘न्यायसेवेतून राष्ट्रसेवा’ या विषयावर तसेच डॉ. चंद्रकांत पोतदार यांचे ‘आई : संस्काराचे विद्यापीठ’, डॉ. मधुकर जाधव यांचे ‘जगाचे आदर्श : छत्रपती शिवाजी महाराज’, प्रा. संजय रायबोळे यांचे ‘व्यसनाधिनता : सामाजिक गंभीर समस्या’ या विषयावर व्याख्याने होतील. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. जे. गावडे, प्रा. यू. एस. पाटील, प्रा. एस. पी. गावडे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना समितीच्या सदस्यांनी संयोजन केले आहे.