तुर्केवाडीत सोपानदेव पुण्यतिथी उत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुर्केवाडीत सोपानदेव पुण्यतिथी उत्सव
तुर्केवाडीत सोपानदेव पुण्यतिथी उत्सव

तुर्केवाडीत सोपानदेव पुण्यतिथी उत्सव

sakal_logo
By

तुर्केवाडीत सोपानदेव पुण्यतिथी उत्सव
चंदगड ः तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे शनिवारपासून (ता. १७) २३ तारखेपर्यंत सोपानदेव पुण्यतिथी उत्सव साजरा होत आहे. ब्रह्मलिंग जीर्णोद्धारित मंदिराचा पहिला वर्धापनदिनही साजरा होत आहे. यानिमित्त होणाऱ्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उद्धव जांभळे (तळाशीकर), सोमनाथ लामकाणे (इचलकरंजी), संतोष सहस्त्रबुद्धे (इचलकरंजी), पुंडलिक काजवे (कोगनोळी), शंकरराव मोरे (सातारा), राजेंद्र दहीभाते (पुणे) यांचे कीर्तन व प्रवचन होणार आहे. बुधवारी (ता. २१) सकाळी अकरा ते दुपारी बारा या वेळेत पुष्पवृष्टी होईल. २२ तारखेला सायंकाळी दीपोत्सव आहे. २३ तारखेला सकाळी नऊ ते साडेदहा या वेळेत पुंडलिक पाटील यांचे कालाकीर्तन होईल. महाप्रसाद वाटप होईल. सायंकाळी पाचनंतर दिंडी व मंगल कलश मिरवणुकीने कार्यक्रमाची सांगता होईल.