
शिबिरातून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास
02225
तावरेवाडी ः हलकर्णी महाविद्यालयाच्या एनएसएस शिबिरात बोलताना संतोष घोळवे. शेजारी गोपाळराव पाटील, संजय पाटील, माधुरी कागणकर आदी.
----------------------------------------
शिबिरातून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास
संतोष घोळवे; हलकर्णी महाविद्यालयाचे तावडेवाडीत शिबिर सुरु
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १५ ः राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होतो, असे मत पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी व्यक्त केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या तावरेवाडी (ता. चंदगड) येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिरात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. संस्थेचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील अध्यक्षस्थानी होते.
गोपाळराव पाटील म्हणाले, ‘विविध सामाजिक उपक्रम एकत्रितपणे राबवणे हे तावरेवाडी गावचे वैशिष्ट्य आहे. श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्व पटवून दिले जाते. त्याचा उपयोग करुन त्यांनी आपले करीअर घडवावे ही अपेक्षा असते.’ उपाध्यक्ष संजय पाटील म्हणाले, ‘मी सुध्दा एनएसएस स्वयंसेवक आहे. सामाजिक क्षेत्रात येण्यामध्ये या शिबिरातून घडलेले संस्कार महत्वपूर्ण आहेत.’ प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, राम कागणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत यश मिळवलेल्या सुयश पाटील, पोलिस दलात निवड झाल्याबद्दल अश्विनी केसरकर हिचा सत्कार केला. सरपंच माधुरी कागणकर, शिवाजी हसबे, मारुती बसर्गेकर, बाबूराव शिंदे, उपसरपंच गणपती खणगुतकर, भाजोगी कागणकर आदी उपस्थित होते. प्रा. अंकुश नौकुडकर, प्रा. ज्योती व्हटकर, प्रा. ज्योती उत्तुरे, राजू बागडी यांनी संयोजन केले. प्रा. यु. एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. शाहू गावडे यांनी आभार मानले. प्रा. जी. जे. गावडे व माधुरी सुतार यांनी सूत्रसंचालन केले.